रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 12 फेब्रुवारी 2023 (12:38 IST)

नवले ब्रिजवर पुन्हा भीषण अपघात

accident
पुणे- पुण्यातील नवले ब्रिज परिसरात नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेला कंटनेर चार वाहनांना धडकला. या भीषण अपघातात 2 जण जखमी झाले आहेत.
 
शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
 
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील शिरवळवरून कंटेनर निघून नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ सेवा रस्त्यावर आला असता कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. ब्रेक फेल झाल्यावर कंटेनरने समोरच्या दोन चारचाकी , एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला धडक दिली.
 
या भीषण अपघातात 2 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. कंटेनर चालकाला ताब्यात घेतले गेले आहे.