1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (22:11 IST)

परतीच्या पावसाचा प्रवास सुरु,काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

The journey of return rains begins
राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरु आहे. येत्या 72 तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ अनुपम कश्यपी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
 
मराठवाडा, विदर्भ या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात आज दिवसभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढील 72 तासात पावसाचा अंदाज आहे. मात्र, राज्यातील उत्तर महाराष्ट्रातून परतीचा पाऊस जाणार असल्याचाही पुणे हवामान विभागाचा अंदाज आहे.

Edited By - Ratandeep Ranshoor