पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रोमच्या 5 नवीन रुग्णांची नोंद  
					
										
                                       
                  
                  				  Pune News: प्रदूषित पाण्यामुळे पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरच्या संसर्गाच्या संशयित प्रकरणांची संख्या आता 163 वर पोहोचली आहे.
				  													
						
																							
									  मिळालेल्या माहितनुसार पुण्यात आणखी पाच जणांना या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची लागण झाल्याचे आढळल्यानंतर महाराष्ट्रात गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या संशयित रुग्णांची संख्या 163 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. राज्यात या आजारामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. तसेच "सोमवारी पाच प्रकरणे नोंदवली गेली आहे.  
				  				  पुणे शहरातील विविध ठिकाणांहून एकूण 168 पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. तसेच आठ जलस्रोतांमधील नमुने दूषित आढळले.				  											 
						
	 
						
	
							 
							
 
							
						
						 
																	
									  Edited By- Dhanashri Naik