बनावट तिकीट घेऊन तरुण पुणे विमानतळावर पोहोचला, विमानात चढण्यापूर्वी पकडले सुरक्षा कर्मचाऱ्यांनी
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी बनावट तिकीट वापरून लखनौला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाला अटक केली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आरोपीने उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीकडून खासगी विमानाचे तिकीट घेतले होते.
पोलिसांनी दोघांविसरुद्ध भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रविवारी पहाटे ३.५५ वाजता ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. "चेक-इन काउंटरवर CISF अधिकाऱ्यांना तरुणाने दाखवलेल्या तिकिटावर बनावट पीएनआर क्रमांक सापडला," विमानतळ पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
चौकशीदरम्यान खानने दावा केला की, इंडिगोच्या विमानाने लखनौला जाण्यासाठी वडिलांना सोडण्यासाठी तो विमानतळावर आला होता. त्याच्या वडिलांच्या तिकिटाचा पीएनआर खरा होता.'' अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तरुणाने पोलिसांना सांगितले की, त्याने त्याचा मित्राकडून 6,500 रुपये देऊन बनावट पीएनआरवर तिकीट मिळवले होते. पोलिस तरुणाची चौकशी करत आहेत.
Edited By- Dhanashri Naik