1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Truck hits two-wheeler in Jadhavwadi two killed

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

apghat
चिखली परिसरातील जाधववाडी येथे एका ट्रकची दुचाकीला जोरदार धड़क दिल्यामुळे अपघात घडला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला. अपघातानान्तर ट्रक चालक पसार झाला. त्याला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

सदर अपघात शनिवारी सायंकाळी घडला. या अपघातात गणेश शहाजी देशमाने आणि हनुमंत जीवन धारवडकर अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत शहाजी देशमाने (वय 26, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ गणेश देशमाने आणि त्यांचा मेहुणा हनुमंत धारवडकर हे दुचाकीवरून जात होते. ते सावतामाळी रोडवर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने 
धडक दिली. या अपघातात ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी ट्रक चालक पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?