सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (18:55 IST)

बारावीत नापास झाल्याने इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

आज बारावीचा निकाल जाहीर झाला. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात आणि परीक्षा देतात.त्याचा परिणाम जाहीर केला जातो. आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आज जाहीर झालेल्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 
 
आज जाहीर झालेल्या निकालात काहींना भरभरून यश मिळाले आहे तर काही अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात गरवारे कॉलेजात वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी इमारतीच्या वरून उडी घेऊन स्वतःचे आयुष्य संपवून आत्महत्या केली आहे. निखिल लक्ष्मण नाईक(19) असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. दुपारी निकाल जाहीर झाल्यावर त्याने आपला निकाल ऑनलाईन पहिला आणि त्यात तो नापास झाल्याचे समजले. तो आतुरतेने निकालाची वाट बघत होता. आपण अपयशी झालो आहोत हे समजल्यावर त्याने थेट इमारतीच्या वरच्या मजल्यावर धाव घेत उडी घेतली आणि तो खाली उभा असलेल्या शेखर लहू कोणारे(30)याच्या अंगावर पडला या घटनेने बेसावध असलेले शेखर हे जखमी झाले त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला.
 
निखिलचे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखिल स्वभावाने शांत होता. क्रिकेटची आवड असेलल्या निखिल ने बॉडी बनवायला जिम सुरु केली होती. निखिल कडून त्याच्या आई -वडिलांच्या खूप अपेक्षा होत्या. त्याच्या आकस्मिक जाण्यामुळे श्रावणधारा वसाहतीमधील महिलांनी दुःख व्यक्त केले आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.