मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 24 मे 2025 (11:20 IST)

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, अजित पवार म्हणाले

Vaishnavi Hagavane suicide case
वैष्णवी हगवणेने सासरच्या मंडळींच्या हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारच्या वतीने पूर्ण प्रयत्न केले जाणार आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालवले जाईल असे आश्वासन दिले. 
या प्रकरणी कोणाचीही गय  केली जाणार नाही. असे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात कोणतीही राजकीय हस्तक्षेप केली जाणार नाही. आरोपींना बेड्या ठोकण्याचे निर्देश पवारांनी दिले. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना मुलासह कालच अटक केली.  
हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होईल, त्यानुषंगाने पावले उचलण्यास सांगितले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
Edited By - Priya Dixit