शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (11:53 IST)

पुण्यातील खडकवासला धरणातून पाणी सोडले, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, लष्कर तैनात

पुण्यात संततधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे धरणे भरली आहे. प्रशासनाने खडकवासला धरणातून पाणी सोडले असून पुण्यात काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. लष्कराचे जवान तैनात करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना  सतर्क राहण्याचे आदेश केले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान धोकादायक स्थळातून लोकांना सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी वेळीच योग्य पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहे. 

भारतीय हवामान विभागाने पुणे आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने सतर्क राहता.नदी पात्रा जवळ आणि धरणांजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफआणि लष्कराची मदत घेण्याचे तसेच बाधित लोकांसाठी अन्न, वस्त्र , निवारा, औषधें, आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे. 

पाण्याच्या विसर्ग व पावसाची परिस्थिती पाहता, पुणे व पीएमआरडी अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान आवश्यक साहित्यांसह विविध भागात तैनात आहे ते आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहे. नागरिकांनी बाहेर पडताना सतर्कता बाळगावी असे आवाहन मुख्यमंत्रीनी केले आहे. 

आज राज्यातील किनारपट्टी, घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाने पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

आज पुणे आणि सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पालघर, नाशिक, अकोला, वर्धा, अमरावती, ठाणे, यवतमाळला यलो अलर्ट देण्यात आले आहे. 
 
Edited by - Priya Dixit