गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (08:23 IST)

रूग्ण आढळल्याने निर्बंध लावणार का ? या प्रश्नाचे पाटील यांनी उत्तर असे दिले उत्तर “पुढे जशी परिस्थिती ओढावेल तसे निर्णय घेतले जातील

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. नायजेरियातून आलेल्या महिलेच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. इतरांना संसर्ग होईल अशी शक्यता नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये ६ ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेले रूग्ण आढळल्याने निर्बंध लावणार का या प्रश्नाचंही पाटील यांनी उत्तर दिलं. “पुढे जशी परिस्थिती ओढावेल तसे निर्णय घेतले जातील. आत्ताच्या परिस्थितीवर नागरिकांना पॅनिक करणे योग्य नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. 
 
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “नागरिकांनी घाबरून जाऊ नये, नायजेरियातून एकच महिला आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. या केसमध्ये इतरांना संसर्ग झाला असेल असं प्रथमदर्शी वाटत नाही. यापुढे प्रत्येकाने काळजी घेणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे.”
 
पिंपरी-चिंचवड शहरातील एकाच कुटुंबातील ६ जणांना ओमायक्रोनची बाधा झाली. ४४ वर्षीय महिला नायजेरियातून दोन्ही मुलींसह पिंपरीत तिच्या भावाकडे आली होती. तेव्हा तिच्यासह भाऊ आणि त्यांच्या दोन मुली अशा एकूण ६ जणांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे. या ६ जणांना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात विलीगकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.