गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 28 जानेवारी 2024 (15:19 IST)

Pune : महिलेची पुण्यात गोळ्या झाडून हत्या

murder
पुण्याच्या हिंजवडी परिसरात एका हॉटेल मध्ये आयटीआय अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा मृतदेह एका हॉटेल मध्ये आढळून आला. वंदना द्विवेदी असे या मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी खून करणाऱ्या प्रियकर आरोपी ऋषभ निगमला पोलिसांनी अटक केली आहे.

मयत वंदना आणि आरोपी ऋषभ हे दोघे लखनौचे असून हिंजवडीत आयटी पार्क मध्ये नौकरी करत होते. ते गेल्या दोन दिवसांपासून हिंजवडीच्या एका हॉटेल मध्ये राहत होते. या दरम्यान ऋषभने वंदनाचा रविवारी पहाटेच्या सुमारास पिस्तूलने गोळ्या झाडून खून केला. खून केल्यानंतर ऋषभ मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करून त्याला पिस्तूलसह अटक केले. त्याने खुनाची कबुली दिली. घडलेला प्रकार प्रेम प्रकरणातून समोर आल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.   
 
Edited By- Priya Dixit