1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (14:15 IST)

सिद्धूंनी केली केजरीवालांची नक्कल, विचारले फक्त 18 वर्षांवरील महिलांनाच एक हजार रुपये का?

पंजाब विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आप एकमेकांवर निशाणा साधत आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी अरविंद केजरीवाल यांना टोला लगावत विचारले की ते केवळ 18 वर्षांवरील महिलांनाच दरमहा एक हजार रुपये देण्याचे आश्वासन का देत आहेत?
 
सिद्धू यांनी केजरीवाल यांच्या या आश्वासनाला मतांशी जोडले आहे. सिद्धू मिमिक्री करत म्हणाले की केजरीवाल म्हणतात की आम्ही 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक महिलेला महिन्याला एक हजार रुपये देऊ. 17 वर्षांची महिला का दिसत नाही? 16 वर्षीय महिला कुठे गेली? 18 वर्षाच्या महिला मतदान करणार कारण तिच्याकडे मते आहेत आणि बाकी सर्व खोटे आहे.