गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 31 मे 2022 (09:14 IST)

नितीश कुमारांनी दिली महाराष्ट्राच्या सुपुत्र अनिल हेगडे यांना उमेदवारी

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या काही वर्षांपासून जदयूवर एकहाती वर्चस्व ठेवलंय. जदयूतील अनेक नेत्यांचं महत्त्व त्यांनी कमी केलंय. नितीशकुमार यांनी आज देखील एक धक्कादायक निर्णय घेतला. राज्यसभेच्या दोन जागांसाठी नितीशकुमार यांनी अनिल हेगडे आणि खीरु महतो यांना उमेदवारी दिली. केंद्रीय मंत्री आरसीपी सिंग यांना उमेदवारी न देता जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या आणि जदयूच्या दिल्लीतील कार्यालयात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्राच्या अनिल हेगडे यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली. तर, दुसरी उमेदवारी झारखंडमधील जेडीयू नेते खीरु महतो यांनी दिली आहे.राज्यसभेच्या द्वीवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशभरात ५७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

आरसीपी सिंग हे आयएस होते. नितीशकुमार यांनी त्यांना दोन वेळा राज्यसभेवर संधी दिली होती. आरसीपी सिंग यांना तिसरी टर्म न देता नितीशकुमार यांनी मोठी खेळी केली आहे. जदयूतर्फे अनिल हेगडे आणि खीरु महतो यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळं आरसीपीसिंग यांच्यापुढं भाजपच्या मदतीचा पर्याय शिल्लक राहतो. भाजपनं मदत केल्यास आरसीपी सिंग यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.