मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified बुधवार, 21 एप्रिल 2021 (08:50 IST)

हे पुरुषोत्तम राम, आंनद घन राम

हे पुरुषोत्तम राम, आंनद घन राम,
आळविते तुजला घेऊन तव नाम,
दे बुद्धी मज अशी हे रामा,जीवन जगण्या,
करीन परोपकार, शालीनता दे वागण्या,
सुडबुद्धी कधीच नको रे, परक्यापरी,
करवून घे सेवा चरणांची तव नित्य खरी,
रामराज्य स्वप्नात न राहावे, ते दिसू दे रे,
राम च राम दिसू दे, प्रत्येक हृदयात रे,
नारी जाती ची महती, लोकां उमगू दे तू,
पर स्त्री माते समान ही भावना रुजव आता तू,
दे बळ पंखात उडण्या, घेण्या भरारी मुक्तपणे,
श्वास माझा राममय होवो हेच मागणे!
..अश्विनी थत्ते