शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Updated : सोमवार, 19 एप्रिल 2021 (11:37 IST)

प्रभू राम यांच्यावर लिहिलेल्या या 5 रामायणच वाचा

प्रभू श्रीराम यांच्यावर भारतात 5 प्रमुख रामायण अधिक प्रचलित आहे ज्यांच्यावर नेहमी चर्चा होत असते. जाणून घ्या यांची नावे-
 
1. वाल्मीकी कृत रामायण : रामायण वा‍ल्मीकी यांनी श्रीराम यांच्या काळातच लिहली होती म्हणून हे ग्रंथ सर्वाधिक प्रमाणिक ग्रंथ मानले गेले आहे. हे मूळ संस्कृत भाषेत लिहिलेलं ग्रंथ आहे.
 
2. श्रीरामचरित मानस : श्रीरामचरित मानस हे गोस्वामी तुलसीदासजी यांनी लिहिले होते ज्यांचा जन्म संवत्‌ 1554 मध्ये झाला होता. गोस्वामी तुलसीदास यांनी श्रीरामचरित मानसची रचना अवधी भाषेत केली होती.
 
3. कम्बन रामायण : तामिळ भाषेत लिखित कम्बन रामायण दक्षिण भारतात अधिक प्रचलित है। याला 'इरामावतारम्' देखील म्हणतात. याची रचना कवि कम्बन यांनी केली होती.
 
4. अद्भुत रामायण : ही रामायण संस्कृत भाषेत लिहिलेली आहे. ज्यात 27 सर्ग उल्लेखित आहे. या ग्रंथाची रचना देखील वाल्मीकी यांनीच केली असे म्हटलं जातं. परंतू याबद्दल स्पष्ट काही सांगता येत नाही.
 
5. आनंद रामायण : या रामायणाचे 9 कांड आहे. पहिल्यात 13, दुसर्‍यात 9, तिसर्‍यात 9, चवथ्यात 9, पाचव्यात 9, सहाव्यात 9, सातव्यात 24, आठव्यात 18, नवव्यात 9 सर्ग आहेत.

या व्यतिरिक्त आसाममध्ये आसामी रामायण, उडिया मध्ये विलंका रामायण, कन्नड मध्ये पंप रामायण, काश्मीरमधील काश्मिरी रामायण, बंगालीमध्ये रामायण पांचाली, मराठी मध्ये भावार्थ रामायण देखील प्रचलित आहे. जगभरात 300 हून अधिक रामायण प्रचलित आहेत.