गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified: रविवार, 18 एप्रिल 2021 (11:49 IST)

श्रीराम पंचवटी नाशिक येथे थांबले होते, जाणून घ्या खास 8 गोष्टी

दंडकारण्यामध्ये अनेक मुनींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या, सरोवरे, पर्वत आणि वने पार करुन नाशिकात अगस्त्य ऋषींच्या आश्रामत गेले. अगस्त्य ऋषींचा आश्रम नाशिकमधील पंचवटी येथे होता. रामायणात पंचवटीचं अत्यंत मनमोहक वर्णन केलेलं आहे.
 
वनवास दरम्यान श्रीरामांनी सीता व लक्ष्मण यांच्यासह काही काळ आश्रामात व्यतीत केला. त्यांनी पर्णकुटी तयार करुन येथे वास्तव्य केलं. 

अगस्त्य मुनींनी रामांना त्यांच्या अग्निशाळेत तयार केलेली शस्त्रे भेट दिली.
 
पंचवटीच्या जवळच मृगव्याधेश्वर येथे मारिचा राक्षसाचा वध झाला होता. याच ठिकाणी जटायू आणि रामांची मैत्री झाली होती. 
 
श्रीराम पंचवटीत राहिले आणि त्यांनी गोदावरी तटावर स्नान आणि ध्यान केले. नाशिका गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान हे पंचवटी म्हणून ओळखले जातात.
 
वड, पिंपळ, आवळा, बेल आणि अशोक हे ते पाच वृक्ष आहेत. ह्याच ठिकाणी सीता मातेच्या गृहेजवळ पाच प्राचीन वृक्ष आहेत. ह्या वृक्षांना पंचवट म्हटले जाते.
 
असे म्हणतात की श्रीराम-सीता व लक्ष्मण ह्यांनी स्वत: ही झाडी लावली. ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. श्रीराम-लक्ष्मणाने खर व दूषण ह्या राक्षसांशी युद्ध देखील केले होते.