बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified: शनिवार, 17 एप्रिल 2021 (09:39 IST)

श्रीराम नवमी 2021: श्रीरामाचे 10 सोपे मंत्र, त्वरित देतील कष्टांपासून मुक्ती

राम नावात अपार शक्ती आहे. त्याचे नाव लिहिले दगड पाण्यात न बुडता तरंगत होते. त्यांच्या द्वारे सोडण्यात आलेला अमोघ बाण रामबाण अचूक ठरला तर त्यांच्या मंत्राच्या शक्तीबद्दल काय म्हणावे? 
 
चैत्र नवरात्री आणि श्रीराम नवमीला रामचरित मानस, वाल्मीकि रामायण, सुंदरकांड इतर अनुष्ठान करण्याची परंपरा आहे. मंत्रांचे जप देखील केलं जातं. काही सोपे मंत्र असे आहेत ज्यांचा जप केल्याने सर्व संकटांपासून वाचता येऊ शकतं. या मंत्रांचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
(1) 'राम' हे मंत्र स्वत:मध्ये पूर्ण आहे आणि शुचि-अशुचि अवस्थेत जपता येतो. याला तारक मंत्र म्हणतात.
 
(2) 'रां रामाय नम:' हा मंत्र राज्य, लक्ष्मी पुत्र, आरोग्य व वि‍पत्ति नाश यासाठी प्रसिद्ध आहे.
 
(3) 'ॐ रामचंद्राय नम:' क्लेश दूर करण्यासाठी प्रभावी मंत्र आहे.
 
(4) 'ॐ रामभद्राय नम:' कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
 
(5) 'ॐ जानकी वल्लभाय स्वाहा' प्रभु कृपा प्राप्त करणे व मनोकामना पूर्ती हेतू जपण्यायोग्य आहे.
 
(6) 'ॐ नमो भगवते रामचंद्राय' विपत्ती-आपत्ती निवारण हेतू जप केला जातो.
 
(7) 'श्रीराम जय राम, जय-जय राम' या मंत्राचं तोड नाही. शुचि-अशुचि अवस्थेत जपण्यात योग्य आहे.
 
(8) श्रीराम गायत्री मंत्र 'ॐ दशरथाय नम: विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्।' हा मंत्र सर्व संकटांचा नाश करणारा आणि ऋद्धी-सिद्धी प्रदान करणारा मंत्र आहे.
 
(9) 'ॐ नम: शिवाय', 'ॐ हं हनुमते श्री रामचंद्राय नम:।' हा मंत्र अनेक कामासाठी जपतात. स्त्रिया देखील याचा जप करु शकतात.
 
सामान्यत: हनुमानजींचे मंत्र उग्र असतात. परंतू शिव आणि राम यांच्या मंत्रांनी जप केल्यास त्यांची उग्रता नाहीशी होते.
 
(10) 'ॐ रामाय धनुष्पाणये स्वाहा:' शत्रू शमन, न्यायालय, खटला इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी मार्ग प्रशस्त करतात.
 
रामरक्षास्तोत्र, सुंदरकांड, हनुमान चालीसा, बजरंग बाण इतर जप करुन अनुष्ठान रूपात लाभ प्राप्त करता येतो.
 
लाल रंगाच्या वस्त्रावर श्री हनुमानजी व भगवान राम यांचे चि‍त्र किंवा मूर्ती समोर ठेवून पंचोपचार पूजन करुन जप करावे. ही सोपी आणि लौकिक विधी आहे.