Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गीतरामायणातील शब्दसौंदर्य

Updated: शनिवार, 1 एप्रिल 2017 (16:40 IST)
  WD
लक्ष्मणाविषयी 'अनुज' या नावाचा केलेला वापर, 'आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे' या सारख्या उपमातर अंगावर रोमांच आणतात. अशा उपमा आता वाक्प्रचार बनल्या आहेत. तो त्रिखंडाचा देव विष्णू त्याचाच अवतार असणारा हा राम व धरेची मुलगी 'दुहीता' असणारी सीता यांचे झालेले मीलन म्हणजे 'मायाब्रम्ह' असे वर्णन करतात, तेव्हा या मीलनाचे भव्यत्व गदीमा किती सार्थ शब्दांत सांगतात, असे लक्षात येते.

प्रत्येक भावानुसार (शांत, रौद्र इ.) वापरात आलेले शब्दही तसेच आहेत त्राटिका वधावेळी रामाला आदेश देणारे विश्वामित्र 'सायका, कार्मुका, तप्त आरक्त लोचने' यासारख्या रुद्रा रसात न्हाऊन निघालेले दिसतात, आणि बाबूजींचे स्वरही या रौद्ररसात भिजलेले असतात. बाबूजींच्या आवाजातले हे 'सोड झणी कामुर्का.....' ऐकल्यावरच आपण वीर रसाने भारून जातो व आपले हात शिवशिवात.

कैकयीची निर्भत्सना करणारा लक्ष्मण आपली रामावरची भक्ती दाखवतो त्या गाण्यात तर शांत व रुद्र रसाचा उत्तम मिलाफ दिसतो एकीकडे रामाच्या वनवासाविषयी चिंता व पित्याचा 'विषय धुंद राजा.....' या शब्दात तो धिक्कारही करतो.

रामाच्या वनवास गमनानंतर भयाण झालेली अयोध्या, राजा जनक व अन्य नागरिकांची व्यथा ही ते अशा शब्दात मांडतात की आपसुकच डोळे झरु लागतात. 'या इथे लक्ष्मणा बांध कुटी....' ऐकताना तर त्यावेळचे दंडकवनच समोर उभे राहते या अन् अशा अनेक गाण्यात आपण गुंतुन जातो.

  WD
सतत राम-सीतेचा रक्षणार्थ सज्ज असणारा लक्ष्मण रामाच्या भल्याचा विचार करणारा 'आश्रया गुहेकडे..... ' गीतरामायणात तर पदोपदी दिसतो.हनुमानच्या वर्णनात तर 'पेटवी लंका हनुमंत.....' असा तो एकच श्री हनुमान... या सारख्या गीतातून तर स्वामीभक्त हनुमानाचेही दर्शन होते.

पूर्वी म्हणे जेंव्हा आकाशवाणीवरून गीतरामायणातील गीते दर आठवड्याला एक याप्रमाणे मालीकेच्या स्वरूपात सादर होत असे त्यावेळी लोकं आपली कामधाम बाजूला ठेवून भक्तीभावाने अगदी रेडीओला हार, फुलं घालून त्यापुढे नारळ फोडून उदबत्ती वगैरे ओवाळून (नादब्रम्हाची सगुण पुजाच बांधायचे!) मग श्रवणभक्तीसाठी बसत असत.

अनेक उपमारत्नांनी भरलेला हा गीतरामायणाच रत्नहार गदिमा व बाबूजी सारख्या रत्नपारख्यांच्या नजरेतून बनलेला असल्याने तो या पुढच्या पिढ्यान् पिढ्यांना ही आपल्या सौंदर्यानी मोहवत राहील यात शंकाच नाही.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

चाणक्य नीती : जीवनसाथी निवडण्यापूर्वी चाणक्य यांनी सांगितलेले ४ आवश्यक नियम जाणून घ्या

रक्षाबंधनादिवशीच होणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; जाणून घ्या 'सूतक' काळ आणि राखी बांधण्याची शुभ वेळ

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

सदाशिवपञ्चरत्नम् : भगवान शिवाची स्तुती करणारे पवित्र स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने लाभ मिळेल

नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर का ठेवत नाहीत? जाणून घ्या यामागील पौराणिक आणि शास्त्रीय कथा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments