बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. रमझान
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (06:45 IST)

'रमजान मुबारक'

इस्लामी कालगणनेतील 9वा महिना 'रमजान मुबारक'ला शुक्रवारी  सायंकाळपासून प्रारंभ झाला या पवित्र महिन्याचे पहिल्या तारखेचे चंद्रदर्शन संध्याकाळी घडले. विभागीय चांद समिती व सुन्नी मरकजी सिरत समितीद्वारे शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी रमजान पर्वला सुरुवात झाल्याची घोषणा शाही मशिदीतून केली. त्यानंतर विविध उपनगरांमधील मशिदीमधूनही मौलवींनी रमजानबाबत उद्घोषणा करत या पवित्र महिन्यात देशावरील कोरोनाचे महासंकट दूर व्हावे आणि संपूर्ण मानवजातीला सुदृढ निरामय आरोग्य लाभावे, अशी 'दुवा' मागितली.
 
संयम सदाचार व आत्मशुद्धी चे पर्व म्हणून रमजान ओळखला जातो यंदा समाज बांधवांना अधिक संयम बाळगून रमजान पर्व चे उपवास पार पाडावे लागणार आहे दरवर्षी रमजान पूर्वमध्ये मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वी अल्पोपहार घेऊन दिवसभर निर्जळी उपवास अर्थात रोजा करतात सूर्यास्त झाल्यानंतर सायंकाळी फलाहार करून  उपवास पूर्ण करतात यावर्षी रमजान पुरवला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच कडक उन्हाळ्यात प्रारंभ झाला आहे तसेच कोरोना या  महाभयंकर आजाराचे सावट देखील या रमजानच्या पर्वावर आहे.