संबंधित माहिती
- रजनीकांत 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या चित्रिकरणा दरम्यान खरंच जखमी की स्टंट?
- वसंत पंचमी हा भारतीय व्हॅलेंटाईन डे आहे का?
- Guinness World Records: अतिगर्दीमुळे असा फसला 'सर्वात जास्त जुळ्यांचा' विश्वविक्रमाचा प्रयत्न
- Budget 2020: अर्थसंकल्प पाहण्यापूर्वी समजून घ्या या 5 संकल्पना
- निर्मला सीतारामन यांच्या समोर 2020 चा अर्थसंकल्प मांडताना अशी आहेत आव्हानं
31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला बँकांचा देशव्यापी संप, दहा लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग
पगारवाढ, सेवाशर्तींमधील सुधारणा या आणि अन्य मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे.
या संपामध्ये राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बँकातील मिळून दहा लाख कर्मचारी सहभागी होतील. या संपामध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली AIBEA, NCBE, आयबोक, बेफी, इन्बोक, इन्बेफ, नोबो अशा नऊ बँकिंग संघटनाही सहभागी होतील.
या बैठकीपूर्वी 30 जानेवारीला मुख्य कामगार आयुक्तांसोबत युनियन्सच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. बैठकीत तोडगा न निघाल्यास कर्मचारी संपावर जातील.
या दोन दिवसीय संपानंतरही कोणता तोडगा निघाला नाही तर 11,12,13 मार्चला पुन्हा संप करण्याचा इशारा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दिला आहे.