शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (16:18 IST)

काकोळी ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे ०७ पैकी ०४ सदस्य विजयी!

राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे. यात अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मनसेनं शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारत विजय संपादीत केला आहे. काकोळी ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली. यात मनसेनं युतीच्या उमेदवारांचा पराभव करत ग्रामपंचायतीवर कब्जा केला.
 
ग्रामपंचायतीत मनसेचा नगरसेवक विराजमान होणार असून, ७ पैकी ४ जागा पक्षानं जिंकल्या आहेत. सर्व विजय उमेदवारांचं पक्षाच्या वतीनं अभिनंदनही करण्यात आलं आहे. “आपले ‘मनसे’ अभिनंदन! घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील ०७ पैकी ०४ सदस्य विजयी!,” अशा शब्दात मनसेनं नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन केलं आहे.
 
त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतीतही मनसेनं दणदणीत विजय मिळवला आहे. ७ जागांपैकी ६ जागा मनसेनं जिंकल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील खैरी सावंगी वाढोणा ग्रुप ग्रामपंचायतीमध्येही मनसेनं एकहाती विजय मिळवला आहे. पक्षानं ७ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत.