मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 18 जानेवारी 2021 (16:11 IST)

परळी मतदारसंघात धनंजय मुंडे समर्थक पॅनेलची बाजी

बलात्काराच्या आरोपामुळे बॅकफूटवर गेलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे ग्रामपंचायत निवडणुकीतील वर्चस्व दिसून आलं आहे. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे समर्थक पॅनेलने बाजी मारली आहे. परळी मतदारसंघातील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती. त्यापैकी 10 ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचा दावा त्यांनी केला आहे. 
 
परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी या दोन तर अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या 3 अशा एकूण 5 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध निवड करण्यात धनंजय मुंडे यांना यश आलेले होते.
 
त्यानंतर झालेल्या उर्वरित गावांमधील निवडणुकीत परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर या 4 गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भोपळा ही एकमात्र ग्रामपंचायत भाजपला राखण्यात यश आले आहे.
 
अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 5 पैकी मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून अंबलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोनही पॅनल विजयी झाले आहेत. तर दत्तपूर 7 पैकी 2 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.