बुधवार, 7 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 16 जानेवारी 2021 (07:48 IST)

धनंजय मुंडेंनी २००६ सालापासून माझा फक्त वापर केला : रेणु शर्मा

धनंजय मुंडेंनी २००६ सालापासून माझा फक्त वापर केला आहे. तसेच माझा प्रत्येक गोष्टीसाठी वापर करण्यात आला. असा आरोप रेणु शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. त्या पुढे म्हणाल्या  की, माझा काही जणांनी वापर करून अन्याय केला तेच माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत. 
 
धनंजय मुंडे यांच्याकडे माझे अश्लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचा दावा रेणू शर्मा यांनी केला. ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार देण्सासाठी गेल्यावर माझी कोणीही दखल घेत नसल्याचेही शर्मा यांनी सांगीतले.
 
याचबरोबर कृष्णा हेगडे नावाची व्यक्ती मला रोज मेसेज करायचे. ज्यानी माझ्यावर तक्रार दिली ते रोज मला मेसेज आणि कॉल करायचे. माझ्यावर तक्रार करत ब्लॅकमेल हा शब्द माझ्या नावासोबत जोडला गेला. मनीष धुरी यांनी माझ्यावर तक्रार केली पण धुरींना मी अल्बमच्या कामासाठी भेटले होते.
 
धुरी हे मला स्वतः मेसेज आणि कॉल करायचे याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यासोबत राहत असल्याचे सांगितल्यावर धुरी यांनी मला मुंडेंवरून शिव्या घातल्या होत्या. ज्या मुंडेंना या धुरींनी शिव्या घातल्या होत्या तेच धुरी मुंडेंना समर्थन देण्यासाठी माझ्यावर तक्रार करत असल्याचाही आरोप रेणु शर्मा यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना केला. याचबरोबर रिझवान शेख मला लग्नासाठी पाठीमागे लागला होता. असे रेणु शर्मा यांनी सांगितले