गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (15:56 IST)

हा धनंजय मुंडेंचा कौटुंबिक प्रश्न आहे : संजय राऊत

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या  आरोपांवर  आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची महत्त्वाची प्रतिक्रिया आली आहे. ‘हा धनंजय मुंडेंचा कौटुंबिक प्रश्न आहे. राष्ट्रवादीचं मुख्य नेतृत्व सुजाण, प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत याचा अनुभव सर्वात जास्त राष्ट्रवादीच्या शीर्ष नेत्यांना आहे. धनंजय मुंडेंवर 
 
टीका करून, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल, असं जर कुणाला वाटत असेल, तर तो भ्रम आहे’,असं संजय राऊत म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली.