शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (15:38 IST)

भाजपाच्या मनात एक निराशा आहे म्हणून .......

हिंदूहृदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "भाजपाच्या बाबतीत काहीही बोलणं किंवा सांगणं आता लोकांना आवडत नाही. ते काहीही बोलतात. भाजपाच्या मनात एक निराशा आहे," असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
 
"बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आणि राहतील. लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान हिंदूहृदयसम्राट असंच आहे. ते आजही हिंदूहृदयसम्राट म्हणून ओळखले जातात. कोणताही राजकीय प्रक्ष असा प्रश्न उचलतो त्यावरून बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान कमी होत नाही," असं राऊत म्हणाले.  
 
याआधी शिवसेनेच्या 'शिवशाही कॅलेंडर २०२१' वरून भाजपानं शिवसेनेवर टीका केली होती. यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला आहे. यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीदेखील कॅलेंडरसह व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.