शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (08:33 IST)

भाजपातील 'त्या' नेत्यांची यादी त्वरीत ईडीकडे द्या : आठवले

बेहीशोबी मालमत्ता कमविणाऱ्या भाजपातील 120 लोकांची यादी आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केल्यानतंर याला रामदास आठवले यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांच्याकडे भाजपातील नेत्यांची यादी असल्यास त्यांनी त्वरीत ती ईडीकडे द्यावी, असे आवाहन आठवले यांनी दिले आहे. भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम करीत नसल्याचे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी यावेळी दिले. कामोठे येथे आरपीआयचा कोकण विभागाचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला, दलितांवर अन्याय होत असल्याचेही यावेळी आठवले यांनी सांगितले.