रेणू शर्मा यांच्या वकिलाने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आता रेणू शर्मा यांच्या वकिलाने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. रेणूच्या भावाला आणि वहिनीला धमकी दिली गेली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव नाहीतर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेल. तुम्हा लोकांना माझी पॉवर माहिती नाही अशी धमकी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आल्याचा मोठा आरोप रेणूच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. माध्यमांनी रेणूच्या वकिलांशी चर्चा केली असता त्यांनी हा गंभीर खुलासा केला. इतकंच नाही तर आम्हाला पोलीस सहकार्य करत नाहीत. अर्धच स्टेटमेंट्स घेतलं आहे. यामुळे आम्ही कोर्टात जाऊ असंही त्यांनी म्हटलं.
				  				  
	 
	रेणूच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाला गेले 4 दिवस झाले तरी अद्याप FIR दाखल केली जात नाही. धनंजय मुंडे हे दबाव टाकत आहेत. रेणू विरुद्ध खोटे केस केले जात आहेत. माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही, बहिणीला केस मागे घ्यायला  सांगा नाहीतर सगळ्या कुटुंबाला खंडणी प्रकरणात अडकवू असं धंनजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना धमकावलं असल्याचंही वकिलांनी माध्यमांसमोर सांगितलं.