मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (09:47 IST)

आता बोला, रेणू शर्मा यांचा वकील रमेश त्रिपाठीवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल

renu sharma
रेणू शर्मा यांचा वकील रमेश त्रिपाठीवरच विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्याबाबत आता विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. त्यांच्यावर 2018 साली वाशीच्या एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय. आपल्या महिला असिस्टंट वकिलावर विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, त्यांच्यावर कलम 354 (अ)च्या कलमाखाली गुन्ह्य दाखल असल्याचंही समजतंय. याच प्रकरणावर येत्या 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. 
 
तक्रारदार महिला रेणू शर्मा यांनी डीएन नगर पोलीस ठाण्याला (14 जानेवारी) भेट दिली होती. यावेळी त्यांनी सहायक आयुक्त यांच्यासमोर जबाब नोंदविला. यावेळी रेणू शर्मा यांच्या वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी उपस्थित होते. पण आता रमेश त्रिपाठींवरच विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे.