सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (07:49 IST)

रेणू शर्मा प्रकरणातील कोण आहेत कृष्णा हेगडे ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यानंतर भाजपच्या एका नेत्याने रेणू शर्मा विरोधात पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. कृष्णा हेगडे असे या भाजपा नेत्याचे नाव असून त्यांनी अप्रत्यक्षपणे मुंडे यांना मदतच केली आहे.  
 
हेगडे म्हणाले की, 2010 सालापासून रेणू शर्मा मला त्रास देत होती. वेगवेगळया फोन नंबरवरुन ती माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला प्रत्येकवेळी टाळत होतो. रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तिला माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायते होते. ती मला हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती” असा आरोप हेगडे यांनी केला आहे.
 
कोण आहेत कृष्णा हेगडे ?
कृष्णा हेगडे हे आता भाजपामध्ये असले तरी ते मूळचे काँग्रेसचे आहेत. माजी आमदार असलेल्या कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विलेपार्ल्यातून विधानसभेची निवडणूकही जिंकली होती. चार वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना हेगडे यांनी त्यावेळचे तत्कालिन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता. 2009 साली हेगडे यांनी विलेपार्ल्यातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2014 साली भाजपाच्या पराग अळवणी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर तीन वर्षांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे ते जावई आहेत.