मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (16:43 IST)

वकील आणि त्यांचे कारकून यांना लोकल प्रवासाची मुभा

वकील आणि त्यांचे कारकून यांनाही आता रेल्वे प्रवासाची संमती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची संमती देण्यात आली होती. तर याआधी  सरसकट सर्व महिलांनाही संमती देण्यात आली आहे. त्यानंतर आता वकील आणि त्यांचे कारकून यांना रेल्वे प्रवासाची संमती देण्यात आली आहे. सकाळची लोकल सुरु झाल्यापासून सकाळी ८ वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७ ते रात्रीची शेवटची लोकल असेपर्यंत वकील आणि त्यांच्या कारकून यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र गर्दीच्या वेळी वकिलांना प्रवास करता येणार नाही. मासिक पासही मिळणार नाही तर प्रत्येक प्रवासासाठी तिकिट काढावं लागणार आहे.