रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (08:56 IST)

कोव्हिड ड्यूटीसाठी राज्यातल्या निवासी डॉक्टर्सना प्रत्येकी 1.21 लाख

कोव्हिड काळात केलेल्या सेवेबद्दल राज्यातल्या शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयं आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सगळ्या निवासी डॉक्टर्सना प्रत्येकी 1 लाख 21 हजार रुपये देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलंय.
विविध मागण्यांसाठी मार्डच्या निवासी डॉक्टर्सनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. त्यानंतर या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या.