बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (09:09 IST)

अहो भाग्य, १ लाखाची रोकड अवघ्या तासाभरात सापडली

मुंबईत राहणारे नागेश सावंत यांची १ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हरवल्यानंतर अवघ्या तासाभरात सापडली. या घटनेत नालासोपारा येथे उतरणाऱ्या एका प्रवाशाने चुकून आपली बॅग समजून नागेश सावंत यांची रोकड असलेली बॅग उचलली होती. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास नागेश यांनी दादरहून विरारला जाण्यासाठी ट्रेन पकडली. नागेश सावंत विरारला राहणाऱ्या आपल्या भावाकडे चालले होते. त्यांच्याकडे १ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग होती. विरार लोकल पकडल्यानंतर त्यांनी डब्यातील रॅकवर पैशांनी भरलेली बॅग ठेवली.
 
विरार स्टेशनवर उतरताना ते रॅकवरुन बॅग काढायला गेले. त्यावेळी बॅग तिथे नव्हती. त्यांनी लगेच वसई रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी नायगाव, वसई आणि नालासोपारामधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण त्यातून काही हाती लागले नाही. तासभरात वसई जीआरपी पोलिसांना तुलींग पोलिस स्टेशनमधून फोन आला. राकेश दास (२३) हा तरुण रोकड असलेली बॅग घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येऊन सुपूर्द केली.