मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2019 (16:02 IST)

राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून सोडचिट्टी दिली

राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकरराव पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केले. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून सोडचिट्टी दिली असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.
 
वाघ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की मी गद्दार नाही किंवा मी पळूनही गेले नाही. मी माझा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन कळविला होता. चित्रा वाघ या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.