ठाण्यामध्ये एक व्यक्तीकडून 10 देशी बॉम्ब जप्त
Thane News : महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीकडून 10 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली असून एका गुप्त माहितीवरून पोलिसांनी पाळत ठेवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार 2 डिसेंबर रोजी हा व्यक्ती साकेत मैदानाजवळ पोहोचला असता त्याला पकडण्यात आले. तसेच त्याच्या बॅगची तपासणी केली असता पोलिसांना 10 देशी बनावटीचे बॉम्ब आढळले. रायगड जिल्ह्यातील रहिवासी असलेला आरोपी हा स्फोटके विकण्यासाठी ठाण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली असून आरोपींनी ही स्फोटके गव्हाच्या पिठात लपवून विकण्यासाठी आणली होती. राबोडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
Edited By- Dhanashri Naik