गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (21:58 IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू

devendra fadanavis
Maharashtra Marathi Breaking News Live Today: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

09:58 PM, 5th Dec
आजपासून महाराष्ट्रात 'देवेंद्र' सरकार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपद भूषवणार
महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीबरोबरच महायुतीतील गदारोळ संपल्याच्या बातम्या समोर येत आहे. नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेत असतील. तसेच राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने  मोठा विजय मिळवला होता. सविस्तर वाचा

08:56 PM, 5th Dec
आमचा उद्देश एकच आहे, फक्त जबाबदाऱ्या बदलल्या आहे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू आणि आम्ही आता थांबणार नाही, दिशा आणि गती तीच आहे फक्त आमच्या भूमिका बदलल्या आहे. आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी निर्णय घेऊ. आम्हाला आमच्या जाहीरनाम्यात नमूद केलेली सर्व कामे पूर्ण करायची आहे असे देखील ते म्हणाले. सविस्तर वाचा  

08:15 PM, 5th Dec
'लाडकी बहीण योजनेत पैसा वाढणार' मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी घोषणा केली आहे. तसेच ते म्हणाले की ही योजना अशीच पुढे सुरु राहील. सविस्तर वाचा

07:36 PM, 5th Dec
मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची पहिली पत्रकार परिषद 
देवेंद्र फडणवीस म्हणाले भूमिका बदली पण दिशा तीच राहील, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. 
लाडकी बहीण योजना पुढे सुरु राहील. 
विरोधी पक्षांचे आवाज आम्ही दाबणार नाही. 
मंत्रिमंडळात जास्त बदल होणार नाही. 

07:26 PM, 5th Dec
अजित पवारांच्या नावावर नवा विक्रम, सहाव्यांदा झाले राज्याचे उपमुख्यमंत्री
हाराष्ट्रात आज नवे सरकार स्थापन झाले असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  तसेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नेते म्हणून अजित पवार यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला आहे. अजित पवार यांनी आज सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सविस्तर वाचा 

07:01 PM, 5th Dec
महाराष्ट्रात कॅबिनेटची पहिली बैठक सुरु झाली 

06:54 PM, 5th Dec
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेता शाहरुख आणि सलमानसह बॉलीवूड स्टार्सने लावली हजेरी
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यात बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, सलमान खान आणि संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले आणि यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार झाले. सविस्तर वाचा 

06:32 PM, 5th Dec
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मंत्रालयात पोहचले. 
शपथविधी सोहळ्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी मुंबईत मंत्रालय मध्ये पोहचले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. मंत्रालयात पोहोचल्यावर तिन्ही नेत्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
संध्याकाळी सात वाजता कॅबिनेटची पहिली बैठक होणार 


06:16 PM, 5th Dec
पीएम मोदींनी एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी उपस्थित होते.

06:13 PM, 5th Dec
पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. त्यांनी हस्तांदोलन करून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

06:09 PM, 5th Dec
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ सविस्तर वाचा 

05:47 PM, 5th Dec
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही त्यांची विक्रमी सहावी वेळ आहे.
 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन शपथविधीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी पीएम मोदींचे नावही घेतले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.
 

05:37 PM, 5th Dec
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी मराठीतून शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

05:33 PM, 5th Dec
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आझाद मैदानात पोहचले
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आझाद मैदानात पोहचले

05:21 PM, 5th Dec
देवेद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मंचावर पोहचले
देवेद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मंचावर पोहचले

05:16 PM, 5th Dec
अमित शाह, जेपी नड्डा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री आझाद मैदानावर पोहोचले
मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, एनडीए उपस्थित आहेत.

05:03 PM, 5th Dec
देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीपूर्वी आईचा आशीर्वाद घेतला

04:54 PM, 5th Dec
अंबानी कुटुंब महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्यात हजर
मुकेश अंबानी, अनंत अंबानी पत्नीसह महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्यात हजर
सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.

04:29 PM, 5th Dec
नीता अंबानींसोबतच सलमान खान आणि शाहरुख खानही फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार
देवेंद्र फडणवीस काही वेळातच महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील प्रतिष्ठित आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित आहेत. राजकीय क्षेत्राबरोबरच उद्योग, चित्रपट आणि क्रीडा जगतातील अनेक स्टार्सही उपस्थित राहणार आहेत. नीता अंबानींसोबतच सलमान खान आणि शाहरुख खानही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

03:52 PM, 5th Dec
आठवडाभरात मंत्र्यांचाही शपथविधी होईल, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आठवडाभरात मंत्र्यांचाही शपथविधी होईल, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, गुरुवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची अर्थखात्यावर चांगली पकड आहे. विशेष म्हणजे अजित पवार हे यापूर्वी महायुती सरकारमध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते.

02:58 PM, 5th Dec
शिंदे उपमुख्यमंत्री होण्याबाबत साशंकता, पत्रकार परिषदेत होईल खुलासा
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दोन वेळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची तयारी करत आहेत. यादरम्यान त्यांच्यासोबत MCP प्रमुख अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, या सोहळ्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही वेळानंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते याचा खुलासा करणार आहेत. मात्र, त्यांनी सरकारमध्ये राहून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, अशी शिवसेना (शिंदे गट) नेत्यांची इच्छा आहे.
 

12:52 PM, 5th Dec
फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी गणेशाचे दर्शन घेतले. 

11:37 AM, 5th Dec
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची गरज नाही - संजय राऊत
शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपला आता एकनाथ शिंदे यांची गरज नसल्याचे म्हटले आहे. भाजप त्यांचा पक्षही फोडू शकतो. संजय राऊत म्हणाले, “आता एकनाथ शिंदे यांची वेळ संपली आहे, त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत. आता शिंदे कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. शिंदे यांचा पक्षही भाजप फोडू शकतो. आजपासून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील.

10:34 AM, 5th Dec
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वाहतूक पोलिसांनी जारी केली ॲडव्हायझरी, मुंबईत राहणार हे रस्ते बंद
भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी 'मी पुन्हा येईन' असा दावा करणारे फडणवीस गुरुवारी त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांसह राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे. सविस्तर वाचा 

09:43 AM, 5th Dec
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथ सोहळ्यात पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार
मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी सोहळा सुरू होईल. कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.सविस्तर वाचा 

09:42 AM, 5th Dec
Pune Porsche Car Accident: आरोपींची कारागृहात चौकशी होणार, कोर्टाने दिली परवानगी
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी विशेष न्यायालयाने बुधवारी या प्रकरणातील तुरुंगात असलेल्या सर्व 10 आरोपींची चौकशी करण्याची परवानगी देण्याची पोलिसांची विनंती मान्य केली. या आरोपींमध्ये आलिशान कार चालवणाऱ्या अल्पवयिनच्या पालकांचाही समावेश आहे. सविस्तर वाचा 
 

08:59 AM, 5th Dec
भंडारा येथे अतिक्रमणावर चालवण्यात आला बुलडोझर
नगरपरिषदेने बुधवारी भंडारा शहरातील अतिक्रमणे हटविण्याच्या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी रस्ते व नाल्यांवरील बेकायदा बांधकामे हटविण्याची मोहीम सुरू केली. तसेच सकाळी दहा वाजता नगरपरिषद, शहर पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त पथकाने सार्वजनिक रस्ते व नाल्यांवरील बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू केली. परिषदेच्या आवाहनावरून अनेकांनी स्वेच्छेने आपली अतिक्रमणे काढली. सविस्तर वाचा

08:58 AM, 5th Dec
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 4 हजार जवान तैनात
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज गुरुवार, 5 डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. फडणवीस संध्याकाळी आझाद मैदानावर शपथ घेणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठीही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात चार हजारांहून अधिक पोलिसांना तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सविस्तर वाचा 
 

08:58 AM, 5th Dec
आज देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस हे तिसऱ्यांदा मुंबईतीलआझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे कार्यवाह एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. सविस्तर वाचा