देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
Devendra Fadnavis sworn in as Chief Minister: देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात अनेक दिग्गज सहभागी झाले होते.
तसेच एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन शपथविधीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी पीएम मोदींचे नावही घेतले. तसेच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
तसेचह अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही त्यांची विक्रमी सहावी वेळ आहे.
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. पीएम मोदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते, तर बॉलिवूड स्टार्ससह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खानसह अनेक स्टार्स सहभागी झाले होते. मुकेश अंबानी देखील यात सहभागी झाले आहे. या कार्यक्रमात पीएम मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. त्यांनी हस्तांदोलन करून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
तसेच महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी उपस्थित होते.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मंत्रालयात पोहचले असून संध्याकाळी सात वाजता कॅबिनेटची पहिली बैठक होणार आहे.