शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (09:18 IST)

बाप्परे, 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून निर्घृण हत्या

साताऱ्यातील फलटण तालुक्यातील काळज गावात 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चिमुकल्याचं दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्यानं अपहरण केलं होतं. या संदर्भात सातारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह विहिरीजवळ आढळून आला. ओम आदिक भगत असं या चिमुकल्याचं नाव आहे. भगत कुटुंबियांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये या चिमुकल्याचा मृतदेह आढळला. 
 
शेजाऱ्यांसोबत असलेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. भगत दाम्पत्याचं शेजाऱ्यांसोबत आणि कौटुंबिक वाद असल्याची कुजबुज परिसरात सुरू आहे. तर दोन दिवसांपूर्वी या चिमुकल्याचं दुचाकीवरून येणाऱ्या दाम्पत्यानं अपहरण केल्याची घटना घडली होती.  या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.