शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (12:44 IST)

धक्कादायक! मनमाडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

मनमाडमधील नांदगावमध्ये एका धक्कादायक प्रकरणात एकाच कुटुंबातील चार जणांची झोपेतच गळे चिरून हत्या करण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून येथ लोक हादरुन गेले आहे.
 
नांदगाव तालुक्यातील वखारी येथे ही घटना घडली असून येथे राहणाऱ्या चव्हाण कुटुंबातील चार चण ज्यात आई-वडिल आणि दोन लहान मुलांची हत्या करण्यात आली आहे. 
 
गुरुवारी मध्यरात्री मारेकऱ्याने 37 वर्षीय समाधान चव्हाण, 32 वर्षीय पत्नी भरताबाई, सहा आणि चार वर्षीय दोन मुलं गणेश आणि आरोही अशा चौघांची झोपेतच हत्या केली. त्या करण्यामागील कारण अद्याप कळू शकले नाही.
 
चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.