शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (09:15 IST)

राम जन्मभूमी आंदोलनात सामील कारसेवकाने सत्कार स्वीकारत सोडले प्राण

बुलढाणा येथे राम जन्मभूमी पूजन निमित्ताने बुधवारी ज्येष्ठ कारसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राम मंदिर निर्माणासाठी आंदोलनात सामील झालेल्या कारसेवकाचा सत्कार झाला आणि लगेच हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
 
77 वर्षीय बल्लूजी उर्फ लक्ष्मीकांत मोहरील यांचे नाव असून ते संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि सेवानिवृत्त शिक्षक होते. 
 
मेहकर येथील श्रीराम मंदिरात रामजन्मभूमी आंदोलनात सामील झालेल्या 50 कारसेवकांचा सत्कार स्थानिक समितीने आयोजित केला होता. यावेळी मोहरील यांचा सत्कार झाला आणि ते खाली बसल्यावर अचानक त्यांच्या छातीत कळ आली. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्यांनी प्राण सोडले.