शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (08:56 IST)

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. 
 
निलंगेकर यांचं पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना किडनीच्या आजारानं निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. परंतु त्यांनंतर त्यांनी करोनावर मातही केली होती.
 
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, नातू आणि पणतू असा परिवार आहे.
 
१९८५ ते ८६ या कालावधीत त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. तसंच राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभारही सांभाळला होता. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू आहेत.