रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (16:44 IST)

सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना राखी बांधताना घडला गंमतीशीर प्रकार

भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन देशभरात साजरा होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनीही रक्षाबंधन सण कुटुंबियांसोबत बारामतीत साजरा केला आहे.
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी कुटुंबासोबत हा रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. दरवर्षी प्रमाणे सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी अजितदादांना (DCM Ajit Pawar) राखी बांधली. यावेळी कोरोनाची परिस्थितीत असल्यामुळे अजितदादा हातातील ग्लोजसह घरी दाखल झाले होते.
 
सुप्रिया सुळे यांनी  अजितदादांना ओवाळून राखी बांधली. पण, झालं असं की, सुप्रियाताईंनी अजितदादांसाठी टोपी आणली होती, पण ओवळणं झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, टोपी घालायची राहूनच गेली. त्यामुळे 'अरेच्या टोपी इथंच राहिली' म्हणून अजितदादांनाही हसू आवरले नाही. यावेळी समोरच शरद पवार (NCP Sharad Pawar)सुद्धा बसलेले होते. हा प्रकार पाहून त्यांनाही हसू उमटले. राखी बांधल्यानंतर अजितदादांनी आपल्या या बहिणीचे आशिर्वाद घेतले आणि पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.