बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (08:42 IST)

सूत्र हे प्रेमाचे आहे, लक्ष्यात ठेव नेहमी

rakhi
तिथे सीमेवर रक्षण्यास गेलास भावा,
इथं बसून मज वाटतो तुझा हेवा,
किती मोठे काळीज तुझे, भेदक नजर,
भाऊ म्हणून जन्मला माझा, गर्व आहे तुजवर,
किती बहिणींचा घेतोस आशीर्वाद शिरी,
भूषण वाटावे तुजवर अशीच तुझी कामगिरी,
नाही रे खंत मज, तू नाहीस इथे म्हणून,
धन्य ही धरा, तुझी मातृभूमी म्हणून,
नाही जरी बांधला मी धागा तुज रेशमी,
सूत्र हे प्रेमाचे आहे, लक्ष्यात ठेव नेहमी,
यावं यशस्वी परतून तू स्वगृही रे,
ओवाळून तव आरती, स्वागतातूर रे!

......अश्विनी थत्ते