शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (16:35 IST)

राखी : बहीण भावाच्या नात्याचं पवित्र कोंदण

एक धागा कच्चा, पण एक दृढ बंधन,
बहीण भावाच्या नात्याचं पवित्र कोंदण,
आंनद वाटतो तो प्रेमानं हातावर बांधताना,
तेच डोळ्यातून दिसतं, तोही बांधून घेताना,
सुरक्षे ची हमी असते ती न बोलता ही,
सीमेवर सुद्धा लढताय माझे अगणित भाई,
अतूट बंधन हे त्यांच्याशी ही तीतकंच दृढ आहे,
प्रत्येक जवान, आमचा भाऊच आहे,
सुरक्षेत आहोत, तो पाहऱ्यावर आहे म्हणून,
मोल तुझ्या अग्निदिव्याचे आहे, सर्व जाणून!
नमन माझे माझ्या ह्या सर्व भावंडा ना,
राखी चा सण, समर्पित या माझ्या भावांना!
....अश्विनी थत्ते