शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (14:41 IST)

भावाच्या हातावर राखी बांध्यापूर्वी या 5 देवतांना बांधावी राखी

रक्षाबंधनाला भावाव्यतिरिक्त, देव,वाहन,पाळीव प्राणी,दरवाजा इत्यादी अनेक ठिकाणी राखी बांधली जाते. या मागचा विश्वास आहे
 
आपल्या संरक्षणासह प्रत्येकाचे रक्षण केले पाहिजे. जाणून घ्या की रक्षाबंधनाला कोणत्या देवतांना विशेष रुपाने राखी बांधली पाहिजे-
 
गणपती : गणपती प्रथम पूज्य देवता आहे.कोणत्याही प्रकाराच्या मांगलिक कार्य करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. म्हणून सर्वातआधी त्यांना राखी बांधली जाते.गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी,मनसा देवी आणि ज्योती आहे.
 
शिव : श्रावण महिना महादेवाचा महिना आहे.या श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो.लोकप्रिय परंपरेनुसार आसावरी देवी भगवान शिवाची बहीण होती.
 
हनुमान : हनुमानजी शिवजी यांचे रुद्रावतार आहे. जेव्हा देव झोपी जातात तेव्हा शिव देखील काही काळासाठी झोपतात आणि ते रुद्रावतारात सृष्‍टीचं संचालन करतात.म्हणून श्रावण महिन्यात हनुमानाची विशेष रुपाने पूजा केली जाते.सर्व संकटांपासून वाचवण्यासाठी हनुमानाला राखी बांधली जाते.
 
कान्हा : शिशुपाल वध करताना श्रीकृष्‍णाच्या हातातून रक्त वाहू लागलं होतं तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीच्या पदरातून कापड फाडून कृष्णाच्या हातावर बांधलं होतं. या कार्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटावेळी रक्षा करण्याचे वचन दिलं होतं.असे देखील म्हटलं जातं की जेव्हा युधिष्ठिरने कृष्णाला विचारलं होतं की मी सर्व संकटांपासून कशा प्रकारे बाहेर पडू शकतो तेव्हा कृष्णाने त्यांच्या व त्यांच्या सेनेच्या रक्षेसाठी राखीचा सण साजरा करण्याचा सल्ला दिला होता. श्रावण महिन्यात श्रीकृष्ण पूजेचं देखील विशेष महत्त्व आहे.
 
नागदेव : मनसादेवी यांचा भाऊ वासुकी यासह सर्व नागांची नाग पंचमीला पूजा केली जाते. रक्षाबंधनच्या दिवशी नागदेवाला देखील राखी अर्पित करण्याची परंपरा आहे.नाग देव सर्व प्रकारच्या सर्प योग आणि भीतीपासून मुक्त करतात.