बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (09:09 IST)

कोकणतल्या गणेशोत्सवासाठी १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार

मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावात जातांना आता १४ दिवसांच्या ऐवजी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना आता १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. १२ ऑगस्ट आधी कोकणात जाणाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल.
 
परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन मार्गदर्शक सूचना सांगितल्या. १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांना स्वॅब टेस्ट बंधनकारक असणार आहे. स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास स्थानिक प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. तर एसटीने जाणाऱ्यांसाठी ३ हजार एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. 
 
एसटीची सुविधा उपलब्ध करुन देतानाच अनिल परब यांनी नियमावलीही सांगितली आहे. एसटी प्रवासात सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यासाठी एका एसटीत केवळ २२ प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असेल. जर २२ जणांनी मिळून एक एसटीचे ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना थेट त्यांच्या गावात सोडले जाईल. एसटीने प्रवास करणाऱ्यांना एसटीत जेवण करावे लागणार आहे.
 
एसटीमध्ये २२ प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असल्यामुळे खासगी बसचालक जादा दराने तिकीट विक्री करत आहेत. त्यावरही नियंत्रण आणले असल्याचे परब यांनी सांगितले. एसटीच्या दीडपट अधिक भाडे खासगी बसचालक आकारू शकतात. त्याहून अधिक बसभाडे आकारल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.