मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जुलै 2020 (08:51 IST)

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्यांतसाठी एसटीने प्रवासाची मुभा

राज्य आणि केद्र सरकारचा नियमाच्या अधिन राहून प्रवासाचे काही नियम शिथिल करून एसटीने प्रवास करण्याची मुभा देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
 
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्यांसाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र केद्र आणि राज्य सरकारचा नियमांच्या अधिन राहून प्रवासात काही नियम शिथिल करून एसटीने प्रवास करण्याची मुभा देण्यात येईल. मात्र हे करत असताना कोकणात कोरोनाच्या प्रसार होणार नाही यांची सुध्दा काळजी राज्य सरकारला घ्यायची आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि आयसीएमआरच्या गाईड लाईन आम्ही मागून घेतली आहे. त्यानूसार एसटी बसेस कोकणात सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र कोकणातील गांवातील ग्रामपंचायतीने चाकरमान्यांना गावात येत असताना १४ दिवस होम कारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्यां साठी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.