मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (08:38 IST)

'या' आहेत मुख्यमंत्र्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच श्रीगणेशाच्या मूर्तीही 4 फुटापर्यंत असावी. गणेशोत्सवाच्या काळात कुणीही कुठेही गर्दी करु नये. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहेच! ती परिस्थिती समजून घेईल. विघ्नहर्ता गणराया पाठीशी आहे असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. 
 
मुख्यमंत्र्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना
यंदा गणरायांचे आगमन घरगुती तसेच सार्वजनिक उत्सव मंडपांत होईल.
गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊन येतील.
गणपतीच्या भव्य मूर्तींऐवजी 4 फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना करावी
मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन आणि विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे.
मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्वाची आहे.
मंडपात नेहमीची गर्दी नको.
गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल.
मंडप देखील लहान आणि साधेच पण सुंदर असावेत.
उत्सवास भीतीचे गालबोट लागू नये.
शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा.