सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: संगमेश्‍वर , शुक्रवार, 10 जुलै 2020 (16:11 IST)

मुंबई-गोवा महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग

मुंबईहून कणकवलीला जाणाऱ्या साईसृष्टी या खाजगी ट्रॅव्हल्स बसला आज सकाळी भीषण आग लागली. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्‍वरनजीक पारेख पंपाजवळ सकाळी सात वाजता ही घटना घडली. यावेळी बसमध्ये २५ प्रवासी होते.

मात्र सुदैवाने आग लागल्याचे कळताच सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडले. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र आगीत बस जाळून खाक झाली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.