बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण

सोने -चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ४८८ रुपयांची घट झाली आहे. या घसरणीमुळे दिल्लीतील सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४९ हजार १३५ रुपयांवर गेला आहे. गेल्या सत्रात बुधवारी सोन्याचे दर १० ग्रॅम ४९ हजार ६२३ रुपयांवर पोहोचला होता.
 
देशांतर्गत सराफ बाजार सोन्यासह चांदाच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गुरुवारी चांदीच्या किंमतीत १ हजार १६८ रुपये प्रति किलोग्रॅम घट झाली आहे. यामुळे चांदीची किंमत ५० हजार ३२६ रुपये प्रतिकिलो झाली आहे. गेल्या सत्रात बुधावरी चांदीची किंमत ५१ हजार ४९४ रुपये प्रतिकिलो ग्रॅम होती.

भारतीय सोनेबाजारात सोन्याची किंमत ही उच्चतम पातळीवर पोहोचली होती. जागतिक बाजारात सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती.