रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2020 (08:49 IST)

मुंबई- कोकण येथे मुसळधार पावासाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

हवामान विभागाने सोमवारी मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा दिला आहे. तसंच मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची कृपा आहेच. आता विभागाने 6 जुलैसाठी मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला आहे. 
 
गेल्या काही दिवसांमध्ये तर मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणीही साचलं होतं. तसेच ट्राफिक समस्याही निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. त्यावर पाऊस सुरू असल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. अशात काळजी घेण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. सरकार सतत आवाहन करत आहे की अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. 
 
यावर्षीही हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.