रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (15:46 IST)

राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याची माहिती

राज्यभरात 18 ते 20 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
 
मुंबई परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. तर नवी मुंबई, ठाणे आणि डोंबिवली परिसरातही पावसाची रिमझिम सुरू आहे. तर रायडमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर ठाणे, कल्याण, पनवेलच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसधार स्वरूपाचा पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी दिली.